मेंटेनन्स थेरपी हा कर्करोग उपचारातील एक प्रकार आहे. रुग्णांमध्ये प्रगत कर्करोग नियंत्रित आणण्यासाठी सुरुवातीचे उपाय पूर्ण झाल्यानंतर मेंटेनन्स थेरपीसाठी कर्करोग तज्ज्ञ पाऊल उचलतात. त्यासाठी काही रुग्णांना तोंडावाटे औषध दिले जाते. तर, काही रुग्णांना सलाईन लावून शिरेतून औषध द्यावे लागते. रुग्णाचा कर्करोग नियंत्रणात ठेवणे आणि त्याच्या जीवनाची गुणवत्ता व्यवस्थित राहील, यासाठी प्रयत्न करणे, हा या उपचार पद्धतीचा मुख्य उद्देश असतो. कोणत्याही दुष्परिणामांशिवाय सुरुवातीच्या उपचारांना मिळालेल्या प्रतिसादानंतर या थेरपीचा विचार कर्करोगतज्ज्ञ करतात.
मेंटेनन्स थेरपी अशी असू शकते
- केमोथेरपी
- हार्मोनल थेरपी
- टार्गेटेड थेरपी
- इम्युनोथेरपी
मेंटेनन्स थेरपी सर्वात कधी वापरली जाते?
- फुफ्फुसाचा कर्करोग
- डिम्बग्रंथि/ स्त्रियांचे कर्करोग
- गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोग
- स्तनाचा कर्करोग
- हेमॅटोलॉजिकल कर्करोग
Read More:
Book Appointment